Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वराने नोआह आणि तारवातील सर्व पाळीव व वन्यप्राण्यांचे स्मरण केले. त्यांनी पृथ्वीवरून वाहण्यासाठी वारा पाठविला आणि पुराचे पाणी ओसरू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 8:1
35 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्या वेळी देवाने अब्राहामाची आठवण केली, आणि लोट राहत होता तेथल्या नगरांचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचवले.


मग देवाने राहेलीची आठवण केली; आणि त्याने तिचे गार्‍हाणे ऐकून तिची कूस वाहती केली.


त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशीही मी करार करून ठेवतो.


हे माझ्या देवा, ह्या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव; माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना यासंबंधाने चांगली कामे मी केली आहेत, ती पुसून टाकू नकोस.


मग मी लेव्यांना आज्ञा केली की, ‘शब्बाथ दिवस पवित्र मानून पाळावा म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा.’ हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या ह्याही कामगिरीचे स्मरण ठेव, आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर.


हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजकवृत्तीचा व लेवीवृत्तीचा करार मोडला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव.


मग लाकडाचे अर्पण व प्रथमउपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.


पाहा, तो जलवृष्टी आवरतो आणि सर्व पाणी आटून जाते; ती तो सोडतो आणि तिच्यामुळे पृथ्वी उद्ध्वस्त होते.


तू मला अधोलोकात लपवशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेवशील, माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल!


कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती.


हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर; माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे;


परमेश्वराने आमची आठवण केली आहे; तो आशीर्वाद देईल, इस्राएलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल.


हे परमेश्वरा, दाविदाप्रीत्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर.


ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.”


परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो; परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.


तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस.


मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली.


तू आपल्या वार्‍याने फुंकले, तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले.


देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले,


उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.


मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’


त्याच्या जलप्रवाहांना झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातील लोकांना मूर्तींचे वेड लागले आहे.


परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की, “मी त्यांची कोणतीही कर्मे खातरीने कधीही विसरणार नाही.


तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”


तो समुद्रास दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो; बाशान व कर्मेल त्याच्यापुढे म्लान होतात, लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.


हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रकट कर, क्रोधातही दया स्मर.


तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल.


तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल.


परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते;


मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले.


कारण तिच्या ‘पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे.


ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली; मग एलकानाने आपल्या स्त्रीला जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan