Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा. नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 6:9
34 Iomraidhean Croise  

नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेथ ह्यांची वंशावळी येणेप्रमाणे : जलप्रलयानंतर त्यांना मुलगे झाले.


अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


आकाश व पृथ्वी ह्यांची परमेश्वर1 देवाने उत्पत्ती केली, तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय.


त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले,


आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;


मथुशलह झाल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;


हनोख देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.


नोहाला शेम, हाम व याफेथ असे तीन मुलगे झाले.


मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.


मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.


शलमोन म्हणाला, “तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याच्यावर तुझी मोठी दया असे; तो तुझ्यासमोर तुझ्याशी सत्याने, नीतीने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्याप्रीत्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसायला त्याला तू पुत्र दिलास; वस्तुस्थितीही अशीच आहे.


त्याने उच्च स्थाने इस्राएलातून काढून टाकली नाहीत; तथापि आसाचे हृदय सार्‍या हयातीत सात्त्विक राहिले.


परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खर्‍या अंत:करणाने केले नाही.


ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही.


परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.”


मी देवाचा धावा करी व तो माझे ऐके, त्यामुळे मला माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांनी हसावे ना! नीतिमान व सात्त्विक मनुष्याला हसावे ना!


सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.


परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे.


परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्‍या उदयप्रकाशासारखा आहे.


सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.


तेव्हा त्यात नोहा, दानीएल व ईयोब हे तिघे असले तरी फार झाले; ते आपल्या नीतिमत्तेमुळे आपला तेवढा जीव वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, नोहा, दानीएल व ईयोब हे त्यात असले तरी त्यांना पुत्राचा किंवा कन्येचा बचाव करता येणार नाही; ते आपल्या नीतिमत्तेमुळे फार तर आपला जीव वाचवतील.


पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; नीतिमान तर आपल्या विश्वासाने1 वाचेल.


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.


यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता.


ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”


कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे.


नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे; कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”


तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्त्विकतेने वाग.


तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan