Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु नोआहवर याहवेहची कृपादृष्टी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 6:8
23 Iomraidhean Croise  

पाहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे; माझा जीव वाचवला ही तुझी माझ्यावर अपार दया झाली आहे; मला डोंगराकडे पळून जाववणार नाही, न जाणो, माझ्यावर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईन.


परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार्‍या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणार्‍याला तो दोषी ठरवतो.


म्हणजे तुला देव व मनुष्य ह्यांच्याकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील.


कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते;


परमेश्वर म्हणतो, “तलवारीपासून निभाव-लेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; ह्या इस्राएलास विश्रांती देण्यास मला जाणे आहे.


तेव्हा त्यात नोहा, दानीएल व ईयोब हे तिघे असले तरी फार झाले; ते आपल्या नीतिमत्तेमुळे आपला तेवढा जीव वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.


देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे.


नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल.


दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी1 वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली,


आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.]


आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते.


तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले.


तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता,


(प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो!) आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.


कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की,


ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे.


तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.


हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसांत तारू तयार होत असता देव सहन करत वाट पाहत होता त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचवण्यात आले.


त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan