Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 6:7
21 Iomraidhean Croise  

म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.


तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशू, वनपशू, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले;


अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.”


परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.


दुर्जन तर नाश पावतील; परमेश्वराचे वैरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील; ते नाहीसे होतील; ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील.


परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात.


परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशू व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत.


तेव्हा परमेश्वराला ह्याबद्दल अनुताप झाला व तो म्हणाला, “असे घडायचे नाही.”


तेव्हा परमेश्वराला ह्याबद्दल अनुताप झाला; प्रभू परमेश्वर म्हणाला, “हेही घडायचे नाही.”


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


“मी भूपृष्ठावरून सर्वकाही निखालस नाहीसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.


“मी मनुष्य व पशू नष्ट करीन; मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन; भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.


तुमचे भले करावे आणि तुमची संख्या वाढवावी ह्यात जसा परमेश्वराला आनंद होत असे तसाच आनंद तुमचा नाश व निःपात करण्यात त्याला होईल; आणि जी भूमी वतन करून घ्यायला तुम्ही जात आहात तेथून तुमचे उच्चाटन होईल.


परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही; पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल, व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील.


“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan