Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा याहवेह म्हणाले, “माझा आत्मा मानवासोबत वादविवाद करीत राहणार नाही, कारण ते दैहिक आहेत आणि त्यांचा जीवनकाल एकशेवीस वर्षे असेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 6:3
17 Iomraidhean Croise  

तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केलीस व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांना बजावत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांना अनेक देशांतील लोकांच्या हाती दिलेस.


ते नश्वर आहेत, वार्‍याची झुळूक निघून जाते आणि परत येत नाही तसे ते आहेत, ह्याची त्याने आठवण केली.


आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.


माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली?


कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे; असतो तर माझ्यापुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवप्राणी गलित झाले असते.


तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, मी त्यांच्यावर अरिष्ट आणतो त्यातून त्यांचा निभाव लागणार नाही; ते मला आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.


मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका;


मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणार्‍या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.


देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत.


अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.


आत्म्याला विझवू नका;


Lean sinn:

Sanasan


Sanasan