Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परमेश्वराच्या पुत्रांनी बघितले की मानवाच्या कन्या सुंदर आहेत; आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 6:2
31 Iomraidhean Croise  

तो मिसरात प्रवेश करणार तोच तो आपली बायको साराय हिला म्हणाला, “पाहा तू दिसायला सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे;


मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.


त्या इसहाक व रिबका ह्यांच्या मनास दु:खदायक झाल्या.


तेव्हा रिबका इसहाकाला म्हणाली, “ह्या हेथींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; ह्यांच्यासारखी हेथींच्या मुलींतली, ह्या देशाच्या मुलींतली एखादी बायको याकोबाने करून घेतली तर मला जगून काय लाभ?”


त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले.


शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.


नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या;


तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.”


संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती.


तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नयेत; व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रांना करू नयेत, त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्यामागे आपल्या वंशजांना तो निरंतरचे वतन ठेवून जाल.’


एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला.


“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?


त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील, आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील.


तरी तू आमचा पिता आहेस; अब्राहाम आम्हांला जाणत नाही; इस्राएल आम्हांला ओळखत नाही, तरी हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आमचा त्राता हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे.


यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे.


ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्‍या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये.


पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे; पती मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये, लग्न करायला ती मोकळी आहे.


आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतासाठी आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा मुंडण करून घेऊ नका,


त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;


कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan