Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 5:5
21 Iomraidhean Croise  

तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”


अनोशाचे एकंदर आयुष्य नऊशे पाच वर्षांचे झाले; मग तो मरण पावला.


शेथ झाल्यावर आदाम आठशे वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.


शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश झाला;


शेथाचे एकंदर आयुष्य नऊशे बारा वर्षांचे झाले; मग तो मरण पावला.


आपल्या सर्वांना मरणे प्राप्त आहे; आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही; देव प्राणहरण करत नसतो तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करत असतो.


आदाम, शेथ, अनोश;


मला ठाऊक आहे की तू मला मृत्युवश करशील; सर्व जीवधारी ज्या स्थळी एकत्र होणार आहेत त्याप्रत मला पोचवशील.


असा कोण मनुष्य आहे की, तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कबजातून आपला जीव कोण सोडवील? (सेला)


आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.


ते चढावाला भितील; रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यांना वाटेल; बदाम फुलेल; टोळसुद्धा जड असा वाटेल; वासना निमेल; कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे, आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्यागल्ल्यांतून फिरतील.


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.


तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो.


पाहा, सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे, जो जीवात्मा पाप करतो तो मरेल.


आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील; तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.”


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan