Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 49:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील; तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 49:8
38 Iomraidhean Croise  

लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.


ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, “आता मी परमेश्वराचे स्तवन करीन;” ह्यावरून तिने त्याचे नाव ‘यहूदा’ ठेवले, पुढे तिचे जनन थांबले.


योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.


यहूदाचे मुलगे : एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.


तू माझ्या वैर्‍यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला.


तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले.


ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले.


परंतु इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मलाच निवडले आहे; मी इस्राएलावर कायमचा राजा व्हावे म्हणून यहूदाने अग्रणी व्हावे आणि यहूदाच्या घराण्यात माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली आणि माझ्या पित्याच्या पुत्रांतून मलाच सर्व इस्राएलावर राजा करावे असे त्याच्या मर्जीस आले.


कारण यहूदाचे वर्चस्व त्याच्या बांधवांवर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला, पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता.


आसाच्या पदरी ढाली व भाले धारण करणार्‍यांची एक सेना होती. यहूदातले तीन लक्ष पुरुष होते; बन्यामिनातले ढाली धारण करणारे व तिरंदाज दोन लक्ष ऐंशी हजार पुरुष होते; हे सर्व शूर योद्धे होते.


त्याने सर्व यहूदी व बन्यामिनी लोकांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या एफ्राईम, मनश्शे व शिमोन ह्या प्रांतांतल्या लोकांना एकत्र केले; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा इस्राएलातले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले.


त्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले; यहूदा देशात आणि एफ्राइमातील जी नगरे त्याचा बाप आसा ह्याने हस्तगत केली त्यांत त्याने ठाणी बसवली.


तरी आशेर, मनश्शे व जबुलून ह्यांतले काही लोक नम्र होऊन यरुशलेमेस आले.


यहूदात देव प्रकट झाला आहे; इस्राएलात त्याचे नाव थोर आहे.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.


यहूदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौर्‍याहत्तर हजार सहाशे भरली.


पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता.


यहूदाच्या इतर मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शेला ह्याचे शेलानी कूळ; पेरेसाचे पेरेसी कूळ; जेरहाचे जेरही कूळ;


ही यहूदाची कुळे; ह्यांची गणती केली ती शहात्तर हजार पाचशे भरली.


यहूदाला हा आशीर्वाद : तो म्हणाला, ‘हे परमेश्वरा, यहूदाचे म्हणणे ऐक, त्याला त्याच्या लोकांमध्ये आण. तो आपल्या हातांनी झगडला; म्हणून त्याच्या शत्रूंविरुद्ध त्याला साहाय्य हो.’


आणि तेव्हापासून ‘आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत’ वाट पाहत आहे.


कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही.


ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, “पुढे येऊन ह्या राजांच्या मानांवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले.


यहूदाच्या संतानाच्या वंशांतील कुळांप्रमाणे त्यांचे वतन हे :


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.”


मग इस्राएल लोक निघून बेथेल येथे गेले आणि त्यांनी देवाला विचारले, “बन्यामिनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “प्रथम यहूदाने जावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan