Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 49:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही; कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केलीस. तो माझ्या शय्येवर चढला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत. कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 49:4
11 Iomraidhean Croise  

इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


इस्राएलाची संतती म्हणजे अर्थात याकोब व त्याचे पुत्रपौत्र मिसरात गेले त्यांची नावे ही : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन,


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याची वंशावळी : रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफ ह्याच्या संततीस देण्यात आला, तरीपण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही;


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


‘जो आपल्या सावत्र आईशी गमन करतो तो आपल्या बापाची बेअब्रू करतो म्हणून तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


‘रऊबेनाचे लोक मोजके असले तरी तो जिवंत राहो, मृत्यू न पावो.’


आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस; आपल्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नकोस; त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजार्‍याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस.’


त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;


आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; त्यांत समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात; अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan