Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 49:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 रऊबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथमफळ आहेस; प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस, तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 49:3
17 Iomraidhean Croise  

लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.”


इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


लेआ हिचे मुलगे : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.


इस्राएलाची संतती म्हणजे अर्थात याकोब व त्याचे पुत्रपौत्र मिसरात गेले त्यांची नावे ही : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन,


योसेफ आपल्या वडिलांना म्हणाला, “बाबा, असे नाही, ज्येष्ठ हा आहे, ह्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवा.”


इस्राएलाचे पुत्र हे : रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याची वंशावळी : रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफ ह्याच्या संततीस देण्यात आला, तरीपण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही;


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याचे पुत्र हनोख पल्लू, हेस्रोन व कर्मी.


त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथमजन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषांचे प्रथमफळ मारले.


त्याने मिसर देशातले प्रथमजन्मलेले सर्व, हामाच्या डेर्‍यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल ह्यांना मारले;


एफ्राइमाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो रऊबेनाचा विभाग.


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची शिरगणती त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन; रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : हनोख ह्याचे हनोखी कूळ; पल्लू ह्याचे पल्लूवी कूळ;


पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा; कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचाच आहे.


आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली ह्यांनी शापवचने ऐकवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.


‘रऊबेनाचे लोक मोजके असले तरी तो जिवंत राहो, मृत्यू न पावो.’


लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो :


Lean sinn:

Sanasan


Sanasan