Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 48:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी पदन येथून येत असता एफ्राथ गाव काहीसा दूर राहिला तेव्हा कनान देशात वाटेतच राहेल माझ्याजवळ मरण पावली. एफ्राथ म्हणजे बेथलेहेमच्या वाटेवर तिला पुरले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी पद्दन-अराम येथून परत येत होतो आणि कनान देशात एफ्राथपासून थोड्याच अंतरावर होतो, तेव्हा राहेलच्या मृत्यूचे दुःख माझ्यावर पडले आणि मी तिला एफ्राथ गावाच्या थोड्या अंतरावर पुरले” (म्हणजे बेथलेहेम).

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 48:7
13 Iomraidhean Croise  

इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान ह्याची बहीण पदन-अरामातील अरामी बथुवेल ह्याची कन्या रिबका ही बायको केली.


याकोब पदन-अरामापासून प्रवास करत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोहचला, आणि नगरापुढे तळ देऊन राहिला.


मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला; तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे.


याकोब पदन-अरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.


त्यांच्यामागून जे मुलगे तुला होतील ते तुझे; त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


“रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”


त्या पुरुषाचे नाव अलीमलेख व त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्यांच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती; हे एफ्राथी म्हणजे बेथलेहेम-यहूदा येथील रहिवासी होते; ते मवाब देशात जाऊन राहिले.


एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते.


आज तू माझ्याकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेल्सह येथे राहेलीच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील; ते तुला म्हणतील, तू जी गाढवे शोधायला गेला होतास ती सापडली आहेत; आणि तुझ्या पित्याने गाढवांची चिंता करायचे सोडले आहे; आता त्याला तुमचाच घोर लागला आहे; तो म्हणतो, ‘मी आपल्या पुत्रासाठी आता काय करू?”’


परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमुवेलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायला आले, व त्यांनी त्याला विचारले, “आपण स्नेहभावाने आला आहात काय?”


आता यहूदातील बेथलेहेमच्या इशाय नामक एफ्राथ्याला दावीद नावाचा पुत्र होता. इशायास आठ पुत्र होते. तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan