Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 48:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी मिसरात तुझ्याकडे येण्यापूर्वी, तुला जे दोन मुलगे मिसरात झाले ते माझेच आहेत, जसे रऊबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि आता, मी येथे मिसर देशास येण्यापूर्वी, मिसराच्या भूमीमध्ये जे तुझ्या पोटी जन्मलेले हे दोन पुत्र, माझे आहेत. तुझे हे दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम हे आता रऊबेन व शिमोन यांच्याप्रमाणेच माझे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 48:5
21 Iomraidhean Croise  

मिसर देशात ओनचा याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्या पोटी योसेफाला मनश्शे व एफ्राईम हे झाले.


ह्या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफाला सांगितले, “पाहा, आपला बाप आजारी आहे,” तेव्हा तो आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांना बरोबर घेऊन त्याच्याकडे गेला.


त्यांच्यामागून जे मुलगे तुला होतील ते तुझे; त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल.


जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले; ती भयाने कंपित झाली, खोल जलेही खळबळली.


तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.


मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.


प्रभू परमेश्वर म्हणतो : “तुम्ही हा देश इस्राएलाच्या बारा वंशांना वतन म्हणून वाटून द्याल तेव्हा त्यात योसेफाचे दोन वाटे धरून त्याच्या सीमा येणेप्रमाणे असाव्यात.


तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ पवित्र व्हावे; कारण मी परमेश्वर पवित्र आहे; तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्‍या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.


योसेफपुत्रांच्या वंशात म्हणजे एफ्राईम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल;


आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”


त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.


याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’


हा देश नऊ वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतनादाखल वाटून दे.” मनश्शे, रऊबेन व गाद ह्यांना देण्यात आलेला प्रदेश


योसेफाच्या संतानाचे दोन वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम; त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप ह्यांच्यासाठी गायराने दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan