Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 48:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तर आता मरणार, तथापि देव तुमच्याबरोबर राहील आणि तुम्हांला तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 48:21
29 Iomraidhean Croise  

आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहचले.


मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील.


तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.


त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन.


पाहा, मी तुझ्याबरोबर आहे; जिकडे-जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन; आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”


याकोब कनान देशात वस्ती करून राहिला; तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला होता.


मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.”


इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा;


नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.”


फारो म्हणाला, “जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या.”


परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझे तारण करणार्‍या देवाचा महिमा वाढो;


“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस;


कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला;


तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील.


तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.”


कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे.


त्याची माता-पितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही, तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो.


इकडे पाहिले तर, मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिले तर, जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे, त्याला मिळाले.


तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.


मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यांतली एकही व्यर्थ गेली नाही.


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल.


कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan