Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 48:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, ते या मुलांना आशीर्वादित करोत. माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, त्यांना पुष्कळ मुलेबाळे व गोत्र लाभोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 48:16
46 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?”


परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्‍यांदा हाक मारून म्हटले,


त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन.


मी मिसरात तुझ्याकडे येण्यापूर्वी, तुला जे दोन मुलगे मिसरात झाले ते माझेच आहेत, जसे रऊबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत.


योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डाहळ्या भिंतीवर पसरल्या आहेत.


दाविदाने बैरोथकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना ह्यांना उत्तर दिले की, “ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचवला त्याच्या जीविताची शपथ,


तेव्हा राजाने आणभाक करून म्हटले, “ज्याने आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटांतून सोडवला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,


तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन.


परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.


माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.


परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.


परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.


परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!


इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.


आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.


त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.


स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा, वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरुषासारखा का झालास? तरी हे परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहेस, तुझे नाम आम्हांला दिलेले आहे; आमचा त्याग करू नकोस.”


मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्का-र्‍यांच्या तावडीतून मुक्त करीन.”


मग ते अदोमाच्या अवशेषाचा व ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,” असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो.


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास भरली.


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो.


ह्यासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा;


इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत.


आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्यामागे चालणार्‍या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची2 परीक्षा पाहू नये.


परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल,


प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.


प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’


यहोशवाने योसेफाच्या घराण्यास म्हणजे एफ्राईम व मनश्शे ह्यांना सांगितले, “तुमची लोकसंख्या मोठी आहे व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हांला केवळ एकच वाटा मिळावा असे नाही,


Lean sinn:

Sanasan


Sanasan