Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 48:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 इस्राएलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यांना त्याच्याजवळ नेले. तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यांना आलिंगन दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 इस्राएलाची दृष्टी म्हातारपणामुळे अशक्त झाली होती, त्यामुळे तो नीट पाहू शकत नव्हता, म्हणून योसेफाने त्यांना त्याच्याजवळ आणले आणि त्याच्या पित्याने त्यांचे चुंबन घेतले व त्यांना कवटाळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 48:10
13 Iomraidhean Croise  

इसहाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव ह्याला बोलावून म्हटले, “बाळा”; तो म्हणाला, “काय आज्ञा?”


त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले; तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा : पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे;


लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला.


आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला; त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले.


इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे तोंड पुनरपि माझ्या दृष्टीस पडेल ह्याची मला कल्पना नव्हती, पण आता पाहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे.”


इस्राएलाच्या दृष्टीला योसेफाचे मुलगे पडले तेव्हा तो म्हणाला, “हे कोण?”


तेव्हा तो बैल सोडून एलीयाच्या मागून धावला; तो त्याला म्हणाला, “मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या; मग मी आपला अनुयायी होईन.” तो त्याला म्हणाला, “परत जा, मी तुझे काय केले?”


त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्‍या अंध होतील.


पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.


ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”


मोशे मृत्युसमयी एकशे वीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती.


त्या वेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते,)


एली ह्या वेळी अठ्याण्णव वर्षांचा होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan