Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 48:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफाला सांगितले, “पाहा, आपला बाप आजारी आहे,” तेव्हा तो आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांना बरोबर घेऊन त्याच्याकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 या गोष्टीनंतर “त्याचा बाप आजारी असल्याचे” कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 काही दिवसानंतर योसेफाला कळविण्यात आले, “तुझे वडील आजारी आहेत.” तेव्हा तो मनश्शेह व एफ्राईम या आपल्या दोन पुत्रांना आपल्यासोबत घेऊन निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 48:1
12 Iomraidhean Croise  

मिसर देशात ओनचा याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्या पोटी योसेफाला मनश्शे व एफ्राईम हे झाले.


आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबाला कळवले तेव्हा इस्राएल सावरून पलंगावर बसला.


मी मिसरात तुझ्याकडे येण्यापूर्वी, तुला जे दोन मुलगे मिसरात झाले ते माझेच आहेत, जसे रऊबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत.


योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्‍या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली.


ज्या दुखण्याने अलीशा मरणार होता ते त्याला आता लागले; तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्याच्याकडे गेला. तो ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, “बाबा! अहो बाबा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!”


ह्यानंतर अलीशा मृत्यू पावला, व लोकांनी त्याला मूठमाती दिली. मग नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली.


त्यानंतर ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला; आणि त्याने चार पिढ्यांपर्यंत आपले पुत्रपौत्र पाहिले.


तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलास शांती असो.


म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.”


याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’


योसेफाच्या संतानाचे दोन वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम; त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप ह्यांच्यासाठी गायराने दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan