Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 47:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मिसर देश तुझ्यापुढे खुला आहे; ह्या देशातल्या उत्तम भागात आपल्या बापाला व भावांना वस्ती करू दे; त्यांना गोशेन प्रांतात राहू दे; त्यांच्यापैकी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यांना माझ्या गुराख्यांचे नायक कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यांना राहण्याकरिता तू मिसर देशातील कोणतेही ठिकाण निवड. त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे, त्यांना गोशेन प्रांतात वस्ती करून राहू दे. आणि त्याच्यात जर कोणी हुशार मनुष्य मनुष्ये तुला माहीत असतील तर मग त्यांना माझ्या गुराढोरांवर अधिकारी कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आणि संपूर्ण इजिप्त देश तुझ्यासमोर आहे; या देशातील उत्तम भागात तुझ्या पित्याला आणि भावांना राहण्यास दे. त्यांना गोशेन येथे राहू दे. आणि त्यांच्यापैकी कोणी विशेष क्षमता असणारे असतील तर त्यांच्यावर माझ्याही गुरांची जबाबदारी सोपवून दे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 47:6
24 Iomraidhean Croise  

तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.


सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”


अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा देश तुला मोकळा आहे; तुला वाटेल तेथे राहा.”


आमच्यात वस्ती करून राहा; हा देश तुम्हांला खुला आहे; त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा.”


तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्वकाही घेऊन माझ्याजवळ राहावे.


तेव्हा तुम्ही सांगा की, ‘बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहोत, आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे.’ अशाने तुम्हांला गोशेन प्रांतात राहायला मिळेल; कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिसरी लोकांना किळस वाटते.”


नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ ह्यांच्या राहण्याची व्यवस्था केली; त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागात म्हणजे रामसेस प्रांतात त्यांना वतन करून दिले.


योसेफ म्हणाला, “तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हांला अन्न देईन.”


ते फारोला आणखी म्हणाले, “आम्ही ह्या देशात काही दिवस राहायला आलो आहोत. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेरडामेंढरांना चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासांना गोशेन प्रांतात राहू द्यावे.”


फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत;


त्या वेळी यराबाम हा मोठा शूर वीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शलमोनाच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमले.


त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.


तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव;


त्याने सर्व इस्राएलांतून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना प्रमुख नेमले म्हणजेच त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक नेमून ठेवले.


ते भट्टीतली राख घेऊन फारोपुढे उभे राहिले; मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे माणसे व गुरे ह्यांना फोड येऊन गळवे झाली.


आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास आणि जनावरे रानात राहू दिली.


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.


आता पाहा, आज तुझ्या हातांत असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करतो; तुला माझ्याबरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये, मी तुझी चांगली व्यवस्था ठेवीन; पण माझ्याबरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नकोस; पाहा, सगळा देश तुझ्यापुढे आहे; तुला बरे व सोईचे वाटेल तिकडे जा.”


कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहेस.


त्या दिवशी तेथे शौलाचा दवेग नावाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता; तो अदोमी असून शौलाच्या गुराख्यांचा प्रमुख होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan