Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 47:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 योसेफाने आपला बाप, आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे ह्यांना त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्नसामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येप्रमाणे भरपूर अन्नसामग्री पुरवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 47:12
16 Iomraidhean Croise  

तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्वकाही घेऊन माझ्याजवळ राहावे.


कारण पाच वर्षे दुष्काळ पडायचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करीन; अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही.


देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.


मग योसेफाने फारोकडे जाऊन त्याला सांगितले, “माझा बाप व माझे भाऊ आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि आपले सर्वस्व घेऊन कनान देशातून निघून आले आहेत; हल्ली ते गोशेन प्रांतात आहेत.”


त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांना दास1 केले.


तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोला द्यावा; बाकीचे चार हिस्से तुमच्या मालकीचे होतील; ते शेताच्या बियाणांसाठी आणि तुम्हांला, तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलाबाळांना खाण्यासाठी ठेवा.”


तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.


आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.


त्याच्या पित्याच्या घराण्याच्या सर्व शाखा व प्रतिशाखा, पंचपात्रीपासून सुरईपर्यंत सगळी पात्रे, ह्यांचा भार त्याच्यावर लटकून राहील.


तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणार्‍या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.


कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.


कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्‍या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.


जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.


हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा होवो; कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते व जी तुला सात पुत्रांहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan