Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 45:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना; त्याने मोठ्याने म्हटले की, “सर्व लोकांना बाहेर घालवा.” योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 45:1
12 Iomraidhean Croise  

तो त्यांच्यापासून एका बाजूला जाऊन रडला; मग परत येऊन तो त्यांच्याशी बोलू लागला; त्याने त्यांच्यातून शिमोनाला काढून त्यांच्यादेखत बांधले.


कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.”


गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो.


तिने त्याच्यापुढे ताट मांडून त्यात त्या वाढल्या, पण तो त्या काही केल्या खाईना. अम्नोन म्हणाला, “माझ्याजवळच्या सर्व लोकांना बाहेर घालवा.” तेव्हा सर्व लोक तेथून निघून गेले.


मी दीर्घकाळ मौन धरले; मी स्तब्ध राहिलो; मी स्वतःला आवरले; वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे मी आता कण्हत आहे, उसासे व धापा टाकत आहे.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.


तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्तात असताना त्याचा अपराध त्याला दाखव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल.


तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हांला केले; त्या आम्ही तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले.


मग दुसर्‍या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.


ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan