उत्पत्ती 42:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 योसेफाने आपल्या भावांना पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यांना विचारले की, “तुम्ही कोठून आलात?” त्यांनी म्हटले, “कनान देशातून धान्य खरेदी करायला आम्ही आलो आहोत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 योसेफाने त्यांना बघताच ओळखले तरी अपरिचितासारखे वागून दरडावून विचारले, “तुम्ही कुठून आला आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “कनान देशाहून आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलो आहोत.” Faic an caibideil |