Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 42:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 42:6
19 Iomraidhean Croise  

त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्‍याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;


मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;


तो स्वत: त्या सर्वांच्या पुढे चालत गेला, आणि भावाजवळ जाऊन पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले.


मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले.


मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली, तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला, तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते.


तेव्हा देशोदेशीचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे गेले, कारण सार्‍या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता.


जेव्हा यहूदा व त्याचे भाऊ योसेफाच्या घरी गेले, तेव्हा तो तेथेच होता, आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले.


योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना.


तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले; मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे.


मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.


जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल.


तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.


त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan