Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 41:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 41:6
8 Iomraidhean Croise  

आणि त्यांच्यामागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली;


मग तो पुन: झोपी गेला असता त्याला दुसर्‍यांदा स्वप्न पडले की, एकाच ताटाला सात चांगली भरदार कणसे आली;


त्या खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न होते.


पाहा, तिची लागवड झाली तरी ती जीव धरील काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती सुकणार नाही काय? ती ज्या वाफ्यात वाढली त्यातच ती मरून जाईल.”


तेव्हा तिच्यावर क्रोध होऊन तिला उपटून जमिनीवर पाडण्यात आले; पूर्वेकडील वार्‍यामुळे तिची फळे करपली; तिचे मजबूत धुमारे मोडून वाळून गेले; अग्नीने खाक केले.


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.


मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan