Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग काइनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले; आणि असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 एके दिवशी काईन आपला भाऊ हाबेलास म्हणाला, “चल, आपण शेतात जाऊ.” त्याप्रमाणे शेतात गेल्यावर काईनाने आपल्या भावावर हल्ला करून त्याचा वध केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 4:8
23 Iomraidhean Croise  

आदामाने आपल्या बायकोस पुन: जाणले, आणि तिला मुलगा झाला; त्याचे नाव तिने शेथ ठेवले; ती म्हणाली, “काइनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे.”


आपल्या दासीचे दोन पुत्र होते, ते दोघे मैदानात झगडत असताना त्यांना सोडवायला कोणी नव्हता; तेव्हा एकाने दुसर्‍याला असा मार दिला की तो ठार झाला.


अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.


यहोराम आपल्या बापाच्या गादीवर कायम होऊन बलाढ्य झाला, तेव्हा त्याने आपल्या सर्व भावांना व इस्राएलाच्या काही सरदारांना तलवारीने वधले.


तेव्हा सनबल्लट व गेशेम ह्यांनी मला सांगून पाठवले की, “चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू;” पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा हेतू होता.


तर निश्‍चये तू आपले निष्कलंक मुख वर करशील; तू स्थिर होशील, निर्भय होशील;


हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्‍यांनो, माझ्यापासून दूर व्हा.


त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत.


त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


कारण पुत्र बापाला तुच्छ मानत आहे, मुलगी आपल्या आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे; मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत.


कोणी एखाद्याला द्वेषबुद्धीने ढकलून दिले, किंवा टपून बसून त्याला काही फेकून मारले आणि त्यामुळे तो मेला;


ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्‍या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा.


म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखर्‍याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच.


येशू त्याला म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?”


विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.


नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.


त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan