Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 काइन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 काइन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद प्रदेशात जाऊन राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद नावाच्या देशात वस्ती करून राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 4:16
19 Iomraidhean Croise  

ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली.


पाहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे; मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार; आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील, असे होईल.”


काइनाने आपल्या बायकोस जाणले, आणि ती गर्भवती होऊन तिला हनोख झाला; काइनाने एक नगर बांधले; त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोख असे ठेवले.


तरी परमेश्वराची त्यांच्यावर कृपा होती; देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्राएलावर कृपा होती; त्यांचा त्याला कळवळा होता व त्यांच्यावर त्याची मेहेरनजर होती, म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्यासमोरून त्यांना दूर केले नाही.


परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टीआड केले. आणि सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.


परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो; त्याला मात्र हात लावू नकोस.” मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला.


मग सैतान परमेश्वरासमोरून गेला; आणि त्याने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले.


त्याला नद्यांचे म्हणजे अर्थात मधाचे, दूधदुभत्याचे प्रवाह व ओघ ह्यांचे दर्शन व्हायचे नाही.


परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत; त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत; ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्लास पावोत.


जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर; जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत;


मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्ण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले,


त्या अर्थी पाहा, मी तुम्हांला अगदी विसरेन, मी तुम्हांला आणि जे नगर तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन;


परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.


पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला, तो याफोस गेला; तेथे त्याला तार्शीशास जाणारे जहाज आढळले; त्याने त्याचे प्रवासभाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शीशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’


तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही.


सर्वकाही त्याच्या द्वारे झाले1 आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही.


कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,


Lean sinn:

Sanasan


Sanasan