Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वर त्याला म्हणाला, “तर मग जो कोणी काइनाला ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” आणि काइन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 यावर याहवेहने त्याला उत्तर दिले, “असे होणार नाही, जर कोणी काईनाचा जीव घेईल, तर त्याला मी तुला दिलेल्या शिक्षेपेक्षा सातपट शिक्षा देईन” आणि मग त्याचा वध कोणीही करू नये, असा इशारा देणारी एक खूण याहवेहने काईनावर केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 4:15
15 Iomraidhean Croise  

काइनाबद्दल सातपट सूड घ्यायचा तर लामेखाबद्दल सत्त्याहत्तरपट घेण्यात येईल.”


परमेश्वराचे वचन हनानीचा पुत्र येहू संदेष्टा ह्याच्या द्वारे बाशा व त्याचे घराणे ह्यांच्याविरुद्ध प्राप्त झाले; ह्याचे कारण हे की बाशाने यराबामाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून परमेश्वराला संताप आणला व त्याने नादाबास ठार मारले.


त्यांना जिवे मारू नकोस, मारलेस तर माझ्या लोकांना विसर पडेल; हे प्रभू, तू आमची ढाल आहेस; आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांना खाली पाड.


हे प्रभू, आमच्या शेजार्‍यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.


पण तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मालमत्ता देईल.


परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”


वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया ह्यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला.


तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन.


तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील.


त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्याला ‘रात्रंदिवस’ विश्रांती मिळत नाही.”


त्यांच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan