उत्पत्ती 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पाहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे; मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार; आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील, असे होईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 खरोखर, तू मला या माझ्या भूमीवरून हाकलून लावले आहेस, आणि तुझ्या जवळ मला येता येणार नाही. पृथ्वीवर तू मला भटकणारा व निर्वासित केले आणि जर मी कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारून टाकेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.” Faic an caibideil |
आता पाहा, माझ्या कुळातले सर्व लोक आपल्या ह्या दासीवर उठले आहेत; ते म्हणतात की, ज्याने आपल्या भावाचा प्राणघात केला त्याला आमच्या स्वाधीन कर. आपल्या भावाचा त्याने वध केला आहे, म्हणून त्याचा प्राण त्याच्या भावाच्या प्राणाबद्दल घेऊ, आणि तुझ्या त्या वारसाचाही नाश करू; ह्या प्रकारे माझा उरलेला निखारा विझवून टाकून माझ्या पतीचे नाव व संतती भूतलावरून नष्ट करायला ते पाहत आहेत.”
आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्या सर्वांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.