Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 34:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याने आपली कन्या दीना हिला भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आपली मुलगी दीना हिला त्याने भ्रष्ट केले हे याकोबाने ऐकले. परंतु त्याची सर्व मुले गुराढोरांबरोबर रानात होती म्हणून ते घरी येईपर्यंत याकोब शांतच राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 34:5
13 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याच दिवशी बांडे व ठिपकेदार एडके, थोडाबहुत पांढरा रंग असलेल्या सर्व ठिपकेदार व कबर्‍या शेळ्या, आणि मेंढरांपैकी सगळी काळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या मुलांच्या हवाली केली.


मग शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “मला ही मुलगी बायको करून द्या.”


इकडे शखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला.


तेव्हा तुम्ही सांगा की, ‘बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहोत, आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे.’ अशाने तुम्हांला गोशेन प्रांतात राहायला मिळेल; कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिसरी लोकांना किळस वाटते.”


अबशालोम अम्मोनास बरेवाईट काही बोलला नाही; अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरले.


मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस.


ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.


त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला.


परंतु त्याने बापाला उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही.


पण काही अधम लोक बोलले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याला काही नजराणा आणला नाही; पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.


शमुवेलाने इशायाला विचारले, “तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय?” तो म्हणाला, “एक सर्वांत धाकटा राहिला आहे; पण पाहा, तो शेरडेमेंढरे राखत आहे.” तेव्हा शमुवेल इशायाला म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही.”


दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जातयेत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan