Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 34:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा त्या देशाचा राजा हमोर हिव्वी याचा मुलगा शखेम याने तिला पाहिले तो तिला घेऊन गेला, आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा पुत्र शेखेम, याने तिला पाहिले, तेव्हा तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला भ्रष्ट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 34:2
23 Iomraidhean Croise  

हिव्वी, आर्की, शीनी,


आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहामाने सांगितले की, “ही माझी बहीण आहे,’ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख ह्याने माणसे पाठवून सारेला आणले.


जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा1 देऊन त्याने विकत घेतली.


मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटले, कारण त्यांनी त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले होते.


याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले.


तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”


तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती.


तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले, ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी समागम केला; (ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती.) मग ती आपल्या घरी गेली.


पण तो काही केल्या तिचे ऐकेना व तो तिच्यापेक्षा बळकट असल्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार करून तिला भ्रष्ट केले.


“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?


माझे मन कोणा स्त्रीला पाहून मोहित झाले असले, मी आपल्या शेजार्‍याच्या दाराशी टपून बसलो असलो,


सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.


ती तुला आवडेनाशी झाली तर तिला वाटेल तिकडे जाऊ दे, पण तिच्याबद्दल पैसा घेऊन तिला मुळीच विकू नकोस, तिला दासीप्रमाणे वागवू नकोस, कारण तू तिला भ्रष्ट केले आहेस.


तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा म तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजार्‍याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला; ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


तर तिच्याशी गमन करणार्‍या पुरुषाने मुलीच्या बापाला पन्नास शेकेल रुपे द्यावे आणि ती त्याची बायको व्हावी; कारण त्याने तिला भ्रष्ट केले आहे. त्याने आमरण तिचा त्याग करता कामा नये.


इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.”


शमशोन तिम्ना येथे गेला; तेथे त्याने एक पलिष्टी मुलगी पाहिली.


तेव्हा एबेदाचा मुलगा गाल म्हणाला, “अबीमलेख कोण की आम्ही शखेमकरांनी त्याचे अंकित असावे? यरुब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबूल हे शखेमाचा बाप हमोर ह्याच्या कुळातील लोकांचे अंकित असतील! पण आम्ही अबीमलेखाचे अंकित का असावे?


Lean sinn:

Sanasan


Sanasan