Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 32:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांना त्याने आज्ञा दिली की, “माझा स्वामी एसाव ह्याला जाऊन सांगा की, आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानाकडे उपरा असा जाऊन राहिलो होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याने त्यांना आज्ञा देऊन म्हटले, “तुम्ही माझे धनी एसाव यांना सांगा, आपला सेवक याकोब असे म्हणतो की, ‘आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि त्याने दूतांना आज्ञा दिली की, तुम्ही माझा धनी एसाव याला जाऊन सांगा: “तुमचा सेवक याकोब म्हणतो, मी आतापर्यंत आपले मामा लाबान यांच्याकडे राहत होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 32:4
23 Iomraidhean Croise  

“स्वामी, आमचे ऐका; आमच्यामध्ये आपण देवाचे एक सरदार आहात; आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या; आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खाजगी कबर द्यायला आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही.”


तेव्हा तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे!” ह्यावरून त्याचे नाव अदोम (तांबडा) पडले.


लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.


तेव्हा इसहाकाने उत्तर दिले, “पाहा, मी त्याला तुझा स्वामी करून ठेवले आहे, त्याचे सर्व भाऊबंद त्याचे सेवक केले आहेत आणि धान्य व द्राक्षारस ह्यांच्या योगे त्याला मी समृद्ध केले आहे; तर माझ्या मुला, आता तुझ्यासाठी मी काय करू?”


गेली वीस वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला.


तेव्हा त्याला सांग की, आपला सेवक याकोब ह्याची ही आहेत; ही त्याने आपला स्वामी एसाव ह्याला भेट म्हणून पाठवली आहेत; पाहा, तोही मागाहून येत आहे.”


आता माझी गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप, दास व दासी आहेत; माझ्या स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवीत आहे.”


तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा, माझी गुरे, मेंढरे व मुले ह्यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन.”


मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.”


म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम.


सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ :


तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”


त्याप्रमाणे ते कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्‍या बांधून इस्राएलाच्या राजाकडे जाऊन म्हणाले, “आपला दास बेन-हदाद म्हणतो, मला जीवदान द्यावे.” राजा म्हणाला, “तो अजून जिवंत आहे काय? तो तर माझा बंधू आहे.”


अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे.


मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.


बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.


ह्यासाठी माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजार्‍याच्या हाती सापडला आहेस; तर जा, त्वरा कर; आपल्या शेजार्‍याला अत्याग्रहाने गळ घाल.


तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.


दुमाविषयीची देववाणी : सेईराहून मला शब्द ऐकू येतो की, “जागल्या, रात्र किती राहिली? जागल्या, रात्र किती राहिली?”


कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


जशी सारा अब्राहामाला ‘धनी म्हणून’ त्याच्या आज्ञेत राहिली; तुम्ही चांगले करत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास, तुम्ही तिच्या मुली झाला आहात.


हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले.


तेव्हा शौल दाविदाचा शब्द ओळखून म्हणाला, “माझ्या पुत्रा दाविदा, हा तुझाच शब्द काय?” दावीद म्हणाला, “माझे स्वामीराज, होय, हा माझाच शब्द.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan