Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 32:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोपे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले;

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 32:3
23 Iomraidhean Croise  

आणि होरी लोकांना त्यांच्या सेईर डोंगरात मार देऊन एल्-पारानाच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटाळून लावले.


तेव्हा तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे!” ह्यावरून त्याचे नाव अदोम (तांबडा) पडले.


मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल.


तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडेमेंढरे, गुरे व उंट ह्यांच्या त्याने दोन टोळ्या केल्या.


तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा, माझी गुरे, मेंढरे व मुले ह्यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन.”


तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरास परत जायला निघाला.


इकडे नेराचा पुत्र अबनेर जो शौलाचा सेनापती होता तो शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याला बरोबर घेऊन नदीपलीकडे महनाईम येथे गेला.


अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.


परमेश्वराच्या वचनानुसार शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून जे लोक युद्ध करण्यासाठी हत्यारबंद होऊन हेब्रोन येथे त्याच्याकडे आले त्यांच्या प्रमुखांची गणती ही :


हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत.


दुमाविषयीची देववाणी : सेईराहून मला शब्द ऐकू येतो की, “जागल्या, रात्र किती राहिली? जागल्या, रात्र किती राहिली?”


अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्राएल आपला प्रभाव दाखवील.


त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले; तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले;


होरेबापासून सेईर डोंगराच्या मार्गे कादेश-बर्ण्या अकरा दिवसांच्या वाटेवर आहे.


सेईर येथील एसावाच्या वंशजांकडून परमेश्वराने होरी लोकांचा संहार केला, तसाच त्याने ह्यांचाही केला; त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली, आणि आजपर्यंत ते तेथे वस्ती करून आहेत.


त्यांच्याशी झगडू नका, कारण त्यांच्या देशातली तसूभरही जमीन मी तुम्हांला देणार नाही; कारण सेईर डोंगर एसावाला वतन म्हणून मी दिला आहे.


त्यांचा मुलुख महनाइमापासून सगळा बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग ह्याचे सर्व राज्य आणि बाशानातली याईर येथील सगळी साठ नगरे येथपर्यंत होता.


मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले, आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला; याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan