Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 32:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, व मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 32:11
21 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यावादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही; परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंदांच्या घरी पोचवले आहे.”


याकोबाला आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले; एसावाने आपल्या मनात म्हटले, “माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत; त्यानंतर मी आपला भाऊ याकोब ह्याला जिवे मारीन.


आपला वडील मुलगा एसाव ह्याचे हे म्हणणे रिबकेला कोणी कळवले तेव्हा तिने आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला बोलावून म्हटले, “पाहा, तुला जिवे मारण्याचा बेत करून तुझा भाऊ एसाव आपले समाधान करून घेत आहे.


मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले.


तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडेमेंढरे, गुरे व उंट ह्यांच्या त्याने दोन टोळ्या केल्या.


तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.


मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, “हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणावेस?”


मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन.


माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत.


हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे.


माझ्या जिवाचे रक्षण कर; मला मुक्त कर; मी तुझा आश्रय धरला आहे म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस.


माझ्याकडे आपला कान लाव; मला सत्वर सोडव; तू माझा प्रबल दुर्ग हो; माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो.


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.


ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.


तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


वाटेने जाताना झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे कोटे तुला आढळले, मग त्यात पिले असोत किंवा अंडी असोत, त्या पिलांवर अथवा अंड्यांवर मादी बसलेली असली तर तिला पिलांसहित धरू नकोस;


त्यांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, ‘आम्ही पातक केले आहे, कारण आम्ही परमेश्वराला सोडून बआल देव व अष्टारोथ ह्यांची भक्ती केली; तर आता आमच्या शत्रूंच्या हातातून आम्हांला सोडव म्हणजे आम्ही तुझी भक्ती करू.’


परमेश्वर न्यायाधीश आहे, तो माझ्या व तुमच्यामध्ये निवाडा करो; माझे प्रकरण लक्षात आणून तो माझा कैवार घेवो, व माझा न्याय करून मला आपल्या हातून सोडवो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan