Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 30:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 याकोबाला आपल्यापासून काही मूलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली आणि ती याकोबाला म्हणाली, “आपण मला पुत्रवती करा, नाहीतर माझा प्राण चालला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 याकोबापासून आपल्याला मुल होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करू लागली; तेव्हा राहेल याकोबाला म्हणाली, “मला मुल द्या, नाही तर मी मरेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 राहेलने पाहिले की याकोबाला तिच्यापासून मूल होत नाही, तेव्हा ती आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली. “मला मूल द्या, नाहीतर मी मरून जाईन,” ती याकोबास म्हणाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 30:1
26 Iomraidhean Croise  

परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली.


त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात


तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला; आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.”


माझा कोण प्रतिवादी होईल? कोणी झाला तर मी गप्प राहून प्राण सोडीन.


मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला?


मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो; वेडा मत्सराने मरतो.


त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन ह्यांचा हेवा केला.


शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.


त्या ह्या : अधोलोक, वांझेचे उदर, पाण्याने कधी पोट भरत नाही अशी पृथ्वी, “पुरे” म्हणून कधी न म्हणणारा अग्नी.


मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


मला तू असेच वागवणार असलास तर मला एकदाचा मारून टाक; तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही.”


मोशे त्याला म्हणाला, “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!”


तेव्हा तो यहूदीया सोडून पुन्हा गालीलात गेला;


कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते.


कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?


कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.


हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;


पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका.


“जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय?


तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan