Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 3:8
20 Iomraidhean Croise  

मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.


तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.”


निबिड मेघ त्याला आच्छादतात म्हणून त्याला दिसत नाही; आकाशमंडळातच त्याचा संचार होतो.


जनसमूहाला भिऊन, कुलीन घराणी मला नावे ठेवतील ह्याचा धाक वाटून मी गपचूप राहिलो व घराबाहेर पडलो नाही, माणसांसारखे1 मी आपल्या अपराधावर झाकण घातले असते, माझे पाप मनातल्या मनात लपवले असते तर,


तेव्हा परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला,


परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


इस्राएलाचे पाप म्हणजे आवेनाची उच्च स्थाने नाश पावतील; त्यांच्या वेद्यांवर काटेकुसळे व काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांना म्हणतील, ‘आम्हांला झाकून टाका, टेकड्यांना म्हणतील, आमच्यावर पडा.’


मी तुमच्यामध्ये वावरेन; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल.


पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला, तो याफोस गेला; तेथे त्याला तार्शीशास जाणारे जहाज आढळले; त्याने त्याचे प्रवासभाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शीशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.


म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां-विषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.


कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो, म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस, नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल.


तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय?


तर आता आम्ही प्राणाला का मुकावे? कारण हा प्रचंड अग्नी आम्हांला भस्म करील, आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी आणखी ऐकत राहू तर मरून जाऊ.


आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.


‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी’, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांतून लपली;’


Lean sinn:

Sanasan


Sanasan