Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 3:6
19 Iomraidhean Croise  

आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.”


आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;


त्यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, “माझ्यापाशी नीज.”


तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती.


त्याने त्याच्याबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले.


“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?


“मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो; तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस.


‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.


“हे मानवपुत्रा, त्यांचे बळ, त्यांचा वैभवमूलक हर्ष, त्यांच्या नेत्रांना प्रिय वाटणार्‍या वस्तू, त्यांच्या जिवाचा इष्टविषय आणि त्यांचे कन्यापुत्र मी त्यांच्यापासून हरण करीन;


त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.


आणि आदाम भुलवला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.


लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या, तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या; पाहा, माझ्या डेर्‍यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत, व रुपे खाली आहे.”


कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;


मेजवानीच्या सातव्या दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली. तिने त्याला फारच गळ घातल्यामुळे त्याने सातव्या दिवशी ते तिला सांगितले. लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan