Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तू माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यंत तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये तू परत जाशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 3:19
33 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;


मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.


“मी तुमच्यामध्ये उपरा व परदेशी आहे; माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टिआड करीन.


ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील;


आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.


तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”


तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण; तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय?


ही माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन;


ते दोघेही बरोबर मातीस मिळतात. कीटक त्यांना व्यापतात.


तर सर्व जीवधार्‍यांचा एकदम प्राणान्त होईल; मानव पुन्हा मातीत मिळेल.


तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाय मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्यापुढे काय पाड! ते पतंगासारखे चिरडले जातात.


कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो.


मनुष्य आपल्या कामधंद्यास जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करतो.


तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात.


तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो.


माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस.


पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.


तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस, आणि म्हणतोस, “अहो मानवांनो, परत जा.”


ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल.


ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत.


ह्या भूतलावर2 मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यांत त्याला काय लाभ?


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात.


तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काहीही फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही.


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे.


चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.


बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे; तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रं-दिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.


कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हादेखील आम्ही तुम्हांला अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan