Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 3:15
48 Iomraidhean Croise  

दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल, हा घोड्याच्या टाचेस दंश करतो तेव्हा त्यावरील स्वार उलथून मागे पडतो.


परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे; तो माघार घेणार नाही; ती शपथ अशी की, “मी तुझ्या पोटच्या फळांतले तुझ्या राजासनावर बसवीन;


ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


हे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.”


बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.


ते कर्मेलाच्या माथ्यावर लपून राहिले, तरी मी त्यांचा सुगावा लावीन व तेथून त्यांना ओढून आणीन; ते समुद्राच्या तळी माझ्या दृष्टिआड लपून राहिले, तरी मी तेथे सर्पाला आज्ञा करीन म्हणजे तो त्यांना डसेल.


ह्यास्तव वेणा देणारी प्रसवेपर्यंत देव त्यांना परक्यांच्या अधीन करील; मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्राएलाच्या वंशजांसह परत येतील.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले.


अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.


शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;


अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?


परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?


सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”


आणि हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे’ चालशील;


पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही.


मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही; पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे.”


मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैर्‍या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?


शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.


“त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.”


परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.


म्हणून तो म्हणतो, “त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना1 कैद करून नेले, व मानवांना देणग्या दिल्या.”


त्याने सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.


कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.


पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.


येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे?


तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला;


‘पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची’ त्याला मुभा देण्यात आली; आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.


तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.


त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan