Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 3:13
15 Iomraidhean Croise  

तेव्हा फारोने अब्रामाला बोलावून म्हटले, “तू मला हे काय केलेस? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितलेस?


योसेफ त्यांना म्हणाला, “हे कसले कृत्य तुम्ही केले? माझ्यासारख्या माणसाला शकुन पाहता येतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?”


यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, “आपण हे काय केले? अबनेर आपणाजवळ आला होता. त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला.


तेव्हा तो त्याला म्हणाला, “मीही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे; परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, ‘त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील.”’ पण हे त्याचे सांगणे खोटे होते.


तिला मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर बसते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे, आणि आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस दूर बसावे.


तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली; ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस?” तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते.


पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?”


कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


आणि आदाम भुलवला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.


शमुवेलाने त्याला विचारले, “तू हे काय केलेस?” तेव्हा शौलाने म्हटले, “जेव्हा मी पाहिले की लोक माझ्याकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले,


शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत; बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan