Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 28:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की, “कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, “तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 28:1
20 Iomraidhean Croise  

मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.


आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस;


तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.”


आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण; मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.”


तेव्हा रिबका इसहाकाला म्हणाली, “ह्या हेथींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; ह्यांच्यासारखी हेथींच्या मुलींतली, ह्या देशाच्या मुलींतली एखादी बायको याकोबाने करून घेतली तर मला जगून काय लाभ?”


एसावाने पाहिले की, इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पदन-अराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठवले आहे; आणि आशीर्वाद देताना त्याने त्याला बजावले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नकोस;


असे झाल्यास आम्ही आमच्या मुली तुम्हांला देऊ व तुमच्या मुली आम्ही करू, आणि आमची वस्ती तुमच्याबरोबर होऊन आपण एक राष्ट्र बनू.


तुम्ही आमच्याशी सोयरीक करा; तुमच्या मुली आम्हांला द्या व आमच्या मुली तुम्ही करा.


तेथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहूदाच्या दृष्टीस पडली; त्याने ती बायको केली व तो तिच्यापाशी गेला.


त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले,


हे सगळे इस्राएलाचे बारा वंश आहेत. त्यांचा बाप त्यांना आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच; प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आशीर्वादाप्रमाणे त्याने आशीर्वाद दिला.


तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका.


देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला तो असा :


मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनेच्या पश्‍चिमेस त्यांच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले होते. यहोशवाने त्यांना आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan