Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 27:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 माझा बाप मला कदाचित चाचपून पाहील आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 27:12
11 Iomraidhean Croise  

ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे.


तेव्हा एसाव म्हणाला, “त्याला याकोब (युक्तीने हिरावून घेणारा) हे नाव यथार्थच ठेवले नाही काय? कारण त्याने दोनदा मला दगा दिला; त्याने माझा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला तो घेतलाच व आता माझ्या आशीर्वादाचाही त्याने अपहार केला; तर आपण माझ्यासाठी काहीच आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”


तुझ्या भावाचा तुझ्यावरचा राग जाऊन तू त्याला जे केले त्याचा त्याला विसर पडेपर्यंत तेथे राहा; मग मी तुला तेथून बोलावणे पाठवून आणीन; एकाच दिवशी तुम्ही दोघांनी मला का अंतरावे?”


तो म्हणाला, “कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.”


सामर्थ्य व चातुर्य ही त्याला आहेत; भ्रांत होणारा व भ्रांत करणारा हे त्याच्या सत्तेत आहेत.


जो परमेश्वराच्या कार्याची हयगय करतो तो शापित होवो; जो रक्तपातापासून आपली तलवार राखतो तो शापित होवो.


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे;


‘जो आंधळ्याची वाट चुकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan