Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 26:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यांना पुन्हा दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 अब्राहामाने आपल्या दिवसात ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या, परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या त्या पुन्हा एकदा इसहाकाने खणून घेतल्या, आणि त्याच्या वडिलाने दिलेली नावेच पुन्हा त्याने दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 26:18
10 Iomraidhean Croise  

मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती त्याबद्दल अब्राहामाने अबीमलेखाला दोष लावला.


तो म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल.”


ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली.


तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोर्‍यात डेरा देऊन तेथे राहिला.


इसहाकाचे चाकर त्या खोर्‍यात खणत असता तेथे त्यांना जिवंत पाण्याचा झरा लागला.


त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.


जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही.


कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्या दिवशी असे होईल की, मी देशातून मूर्तींच्या नावांचा उच्छेद करीन, त्यांची ह्यापुढे आठवण होणार नाही आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यांना मी देशातून घालवून देईन.


आणि मूळची नबो व बाल-मौन (ह्यांची नावे बदलून) व सिब्मा ही नगरे वसवली आणि त्यांनी वसवलेल्या नगरांना निरनिराळी नावे दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan