Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 24:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 नंतर तो म्हणाला, “हे परमेश्वरा, तू माझा धनी अब्राहाम याचा देव आहेस, आज मला यश मिळण्यास मदत कर आणि तू प्रामाणिकपणाने करार पाळणारा आहेस हे माझा धनी अब्राहाम ह्याला दाखवून दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्यावेळी त्या सेवकाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझ्या धन्याच्या परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्यावर दया करा आणि ज्या उद्देशाने मी हा प्रवास केला तो सफल करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 24:12
29 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला; परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे ह्याचा विचार करत तो स्तब्ध राहिला.


तो म्हणाला, “माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यावादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही; परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंदांच्या घरी पोचवले आहे.”


मी आज विहिरीजवळ आलो तेव्हा म्हणालो, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर,


मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर ह्याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले.


त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तुझा बाप अब्राहाम ह्याचा मी देव आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम ह्याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन.”


मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.”


तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले?” तो म्हणाला, “आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले.”


आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;


माझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा ‘धाक’ (देव) माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दु:ख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपल्याला धमकावले.”


तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत.


मग याकोब म्हणाला, “हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहाम व इसहाक ह्यांच्या देवा, तू मला सांगितलेस की, तू आपल्या देशास, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन.


सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवळा येवो व तुम्ही त्या मनुष्यापुढे गेलात म्हणजे तो तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन ह्यांना तुमच्या हवाली करो. ह्यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो.”


संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे.


एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलीशा पलीकडे गेला.


हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे कर.” (ह्या वेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो.)


राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली,


हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर.


यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो.


परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे.


आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.


आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.


तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.


तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.


ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.”


कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan