Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा अब्राहामाने उठून त्या देशाच्या लोकांना म्हणजे हेथींना नमन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अब्राहाम उठला व त्याने हेथीच्या मुलांना आणि देशातील लोकांस नमन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 23:7
11 Iomraidhean Croise  

कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,


त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्‍याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;


मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;


तेव्हा अब्राहामाने त्या देशाच्या लोकांना नमन केले,


“स्वामी, आमचे ऐका; आमच्यामध्ये आपण देवाचे एक सरदार आहात; आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या; आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खाजगी कबर द्यायला आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही.”


तो त्यांना म्हणाला, “मी आपल्या मयतास दृष्टिआड करावे अशी तुमची इच्छा असल्यास माझे म्हणणे ऐका; एफ्रोन बिन सोहर ह्याच्याकडे रदबदली करा की,


मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.


जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.


सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan