Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 23:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी चारशे शेकेल रुपे त्याला तोलून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तेव्हा अब्राहामाने एफ्रोनाचे ऐकले आणि हेथीची मुले ऐकत असता त्याने जितके रुपे सांगितले होते तितके, म्हणजे व्यापाऱ्याकडचे चलनी चारशे शेकेल रुपे एफ्रोनाला तोलून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्‍यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 23:16
18 Iomraidhean Croise  

“स्वामी माझे ऐका : ही अवघी चारशे शेकेल रुपे किंमतीची जमीन, तिचे काय मोठे? आपण आपल्या मयतास मूठमाती द्या.”


आम्ही उतारशाळेत जाऊन पोहचलो आणि आपल्या गोण्या उघडल्या तर प्रत्येकाचा पैसा होता तेवढा प्रत्येकाच्या गोणीच्या तोंडी सापडला, तो आमच्याबरोबर आम्ही परत आणला आहे.


मग त्याने त्यांना आज्ञा केली की, “मी आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेन तेव्हा मला एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांजवळ पुरा.


त्यांनी त्याला कनान देशात नेऊन मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत मूठमाती दिली; अब्राहामाने एफ्रोन हित्तीकडून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा.


तो वर्षातून एकदा आपले मस्तक मुंडवत असे; त्याच्या केसांचा भार त्याला होत असे म्हणून तो ते कातरत असे; आपले केस कातरल्यावर तो ते तोलून पाही, तेव्हा ते सरकारी वजनाप्रमाणे दोनशे शेकेल भरत असत.


राजा अरवानाला म्हणाला, “नाही नाही, ह्या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन; मी आपला देव परमेश्वर ह्याला फुकटचे होमबली अर्पण करणार नाही.” मग दाविदाने पन्नास शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले.


उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही; चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही.


जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा (शेकेल म्हणजे वीस गेरे); हा अर्धा शेकेल परमेश्वराप्रीत्यर्थ केलेले समर्पण होय.


मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व साक्षी बोलावून त्याला पैसा तागडीने तोलून दिला.


मग मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यापासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले.


शेकेल2 वीस गेरांचा2 असावा आणि माने2 वीस शेकेलांचा, पंचवीस शेकेलांचा किंवा पंधरा शेकेलांचा असावा.


मग मी त्यांना म्हणालो, “तुम्हांला बरे दिसले तर मला माझे वेतन द्या, नाहीतर जाऊ द्या.” तेव्हा त्यांनी मला माझे वेतन तीस रुपये तोलून दिले.


ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्टग्रंथ ह्यांचे सार हेच आहे.


त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले.


एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.


कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan