Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 23:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 “स्वामी, नाही, माझे ऐका. ते शेत आणि त्यात असलेली गुहा ही मी आपल्याला देतो. माझ्या भाऊबंदांसमक्ष मी आपल्याला देतो, तेथे आपल्या मयतास माती द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 “नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हास देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हास देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हास देतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 23:11
15 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राहामाने त्या देशाच्या लोकांना नमन केले,


हेथींसमक्ष, वेशीतून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांसमक्ष, अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले.


“स्वामी, आमचे ऐका; आमच्यामध्ये आपण देवाचे एक सरदार आहात; आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या; आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खाजगी कबर द्यायला आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही.”


पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो.


कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणार्‍याला जिवे मारावे; पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये.


मग त्याने जवळ उभे राहणार्‍यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’


ज्याला जिवे मारायचे असेल त्याला दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे; एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये.


एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्याविरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही; दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबीत व्हावा.


इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला.


तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्‍या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो;


तर मला वाटते की, तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडील जन ह्यांच्यासमक्ष ती जमीन तू खरेदी करावीस. तुला ती सोडवायची असली तर सोडव; ती सोडवायची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल; कारण ती सोडवणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही; तुझ्यामागून माझा हक्क आहे.” तो म्हणाला, “मी ती सोडवतो.”


बवाज त्या वडील मंडळीला व सर्व लोकांना म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्योन व महलोन ह्यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan