Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तिसर्‍या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तिसर्‍या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 22:4
19 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक ह्यांना घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला.


अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”


“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.


तिसर्‍या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता.


नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहचले; त्या रानातून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना.


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


त्याने लोकांना सांगितले की, तिसरा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्रीस्पर्श करू नका.


ते म्हणाले, “इब्र्यांच्या देवाने आम्हांला भेट दिली; तर आता आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्यावा; असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तलवारीने आमचा समाचार घेईल.”


तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्‍या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.


त्या यज्ञबलीचे काही मांस तिसर्‍या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.


मग इस्राएल लोक परमेश्वराच्या पर्वतापासून मार्गस्थ होऊन तीन दिवसांची वाट चालून गेले; त्यांच्यासाठी मुक्कामाची जागा हेरण्याकरता परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्यापुढे त्या तीन दिवसांच्या प्रवासात होता.


त्याने तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी ती राख घेऊन स्वतःला शुद्ध करावे; तथापि तिसर्‍या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही.


शुद्ध असलेल्या माणसाने अशुद्ध माणसावर तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी ते शिंपडावे; ह्याप्रमाणे सातव्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे; त्याने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल.


सात दिवस तुम्ही छावणीबाहेर तळ देऊन राहा; तुमच्यापैकी ज्यांनी एखाद्याला जिवे मारले असेल आणि ज्यांना मारलेल्याचा स्पर्श झाला असेल तितक्यांनी तिसर्‍या व सातव्या दिवशी स्वतःला व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.


ते त्याला जिवे मारतील आणि तिसर्‍या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले.


त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्‍या दिवशी मी परिपूर्ण होईन.


तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्‍या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले;


“छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की, ‘आपली भोजनसामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसांच्या आत तुम्हांला ही यार्देन ओलांडायची आहे.”’


मग दावीद पलीकडील बाजूस एका दूरवरच्या टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan