Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 22:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 22:2
18 Iomraidhean Croise  

मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव इसहाक ठेव; त्याच्या पश्‍चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन.


तेव्हा देव अब्राहामाला म्हणाला, “हा मुलगा व तुझी दासी ह्यांच्यासंबंधी तू वाईट वाटून घेऊ नकोस; सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक; कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार.


अब्राहामाला सारेपासून मुलगा झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.


मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.”


“परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस;


तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक ह्यांना घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला.


देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले.


नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी ह्यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले.


तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज ह्याला नेऊन तटावर त्याचा होम केला, ह्यावरून इस्राएलावर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.


मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शलमोनाचा बाप दावीद ह्याला दर्शन दिले होते त्या अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात दाविदाने नेमलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शलमोनाने सुरू केले.


हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या ह्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?”


देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.


परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.


ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?


‘अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले;’ ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राचे’ अर्पण करत होता;


तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन.”


दोन महिन्यांनंतर ती आपल्या बापाकडे परतली. तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्याबाबत केले. तिचा पुरुषाशी शरीरसंबंध झाला नव्हता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan