Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 22:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 22:11
21 Iomraidhean Croise  

रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्‍याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली.


देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे.


ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”


ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?”


मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला.


मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.”


“परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस;


स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण.


तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, “याकोबा”; मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?”


मग इस्राएल योसेफास म्हणाला, “तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना? तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.” तो म्हणाला, “हा मी तयार आहे.”


तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?”


ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”


तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले.


ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे, मोशे.” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?”


तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”


तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण.’


तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”


परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;


तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”


तेव्हा परमेश्वराने शमुवेलास हाक मारली; तो म्हणाला, “काय आज्ञा?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan