Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हागार मिसरिणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परंतु अब्राहामाला इजिप्त देशाची स्त्री हागार, हिच्यापासून झालेला पुत्र, इसहाकाला चिडवीत असताना साराहने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 21:9
19 Iomraidhean Croise  

अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मूलबाळ झाले नव्हते; तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती.


हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; हागारेपासून झालेल्या आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.


इश्माएलविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे; पाहा, मी त्याचे कल्याण करीन; त्याला सफळ व बहुगुणित करीन; त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील; मी त्याचे मोठे राष्ट्र करीन.


तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.


ह्या प्रकारे एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतांतील नगरानगरांतून फिरत जासूद जबुलूनापर्यंत गेले, पण लोकांनी त्यांची टर उडवून फटफजिती केली.


पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.


“असे असूनही आता जे माझ्याहून अल्प वयाचे आहेत, ज्यांच्या वडिलांची लायकी माझ्या मेंढ्याबकर्‍या राखण्यास कुत्रे म्हणून ठेवण्याचीही मी समजत नसे, ते माझी टवाळी करतात;


मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे.


“तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो.


वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.


उन्मत्तपणा करणार्‍यास घालवून दे म्हणजे भांडण मिटेल, आणि कलह व अप्रतिष्ठा ही बंद पडतील.


यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्‍याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.


कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.


परंतु त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे.


आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan