Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ते बाळ वाढू लागले आणि ज्या दिवशी इसहाकाचे दूध तोडण्यात आले, त्या दिवशी अब्राहामाने एक मोठी मेजवानी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 21:8
16 Iomraidhean Croise  

पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले; त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले; त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले.


ती आणखी म्हणाली, “सारा मुलास पाजील असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? पण त्याच्या म्हातारपणी माझ्यापासून त्याला मुलगा झाला आहे!”


हागार मिसरिणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले.


तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांचे खाणेपिणे झाले.


मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांना जमवून मेजवानी दिली.


तिसर्‍या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरांना मेजवानी दिली, आणि त्याने आपल्या प्यालेबरदारांचा नायक व आचार्‍यांचा नायक ह्यांना पुढे आणले.


अबनेर वीस पुरुष बरोबर घेऊन हेब्रोनास दाविदाकडे आला, तेव्हा दाविदाने अबनेरास व त्याच्याबरोबरच्या लोकांना मेजवानी दिली.


शलमोन जागा झाला तेव्हा आपल्याला स्वप्न पडले असे त्याला समजले; मग यरुशलेमेला जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली व आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.


आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक ह्यांना मेजवानी दिली; पारस व मेदय ह्यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले;


खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे.


लो-रुहामेचे दूध तोडल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला पुत्र झाला.


मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला; तेथे शमशोनाने मेजवानी दिली. त्या काळच्या तरुणांमध्ये तशी प्रथा होती.


शमशोन त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला एक कोडे घालतो. मेजवानीच्या सात दिवसांत ते उलगडून त्याचा अर्थ तुम्ही सांगाल तर मी तुम्हांला तीस तागे व तीस पोशाख देईन.


हन्ना तेवढी गेली नाही; ती आपल्या पतीला म्हणाली, “बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते. मग मी त्याला घेऊन जाईन म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील.”


त्याचे दूध तोडल्यावर ती त्याला घेऊन गेली; तिने तीन गोर्‍हे, एक एफाभर सपीठ, एक बुधलाभर द्राक्षारस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात मुलाला घेऊन गेली; तो त्या वेळी केवळ बालक होता.


मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan