Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 21:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ती आणखी म्हणाली, “सारा मुलास पाजील असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? पण त्याच्या म्हातारपणी माझ्यापासून त्याला मुलगा झाला आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आणि ती अजून म्हणाली, “अब्राहामाला कोणी सांगितले असते काय की साराह तिच्या बाळाला स्तनपान करेल? तरीही मी अब्राहामाला त्याच्या म्हातारपणी एक अपत्य दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 21:7
15 Iomraidhean Croise  

अब्राहामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, “शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? नव्वद वर्षांच्या सारेला मूल होईल काय?”


परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली?


तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.


तहपनेस राणीच्या बहिणीच्या पोटी त्याला गनुबथ नावाचा पुत्र झाला; तहपनेस हिने फारोच्या वाड्यात त्या मुलाच्या थानमोडीचा समारंभ केला; तेव्हापासून गनुबथ फारोच्या वाड्यात त्याच्या पुत्रांबरोबर राहिला.


सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले.”


कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.


हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत.


तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील, ‘माझी मुले तर हिरावून नेली आहेत, मी वांझ आहे, मी स्वदेशाला मुकले आहे, व परागंदा झाले आहे, अशा माझ्यासाठी ह्यांना जन्म कोणी दिला? ह्यांना लहानाचे मोठे कोणी केले? पाहा, मी एकटीच उरले होते; ही कोठे होती?”’


अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय? परंतु सीयोनेने वेणा दिल्या, ती आपली मुले प्रसवली.


“तुला पुत्र झाला” हे वर्तमान माझ्या बापाला कळवून त्याला फार हर्षित करणारा मनुष्य शापित असो.


याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राएल ह्यांच्याविषयी असे म्हणतील, ‘देवाने केवढे कार्य केले!’


ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan